ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवापूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद व अंगणवाडी सेविकाची मासिक आढावा

शैक्षणिक सहविचार सभा व सेवानिवृत्त सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

29 डिसेंबर 2025 सोमवार ला पारडी केंद्र अंतर्गत सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळेत शिकवणारे शिक्षकाची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश गेडाम तर उद्घाटक मा.श्री कल्याण जोगदंड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा विशेष अतिथी सौ आशाताई वाघमारे पर्यवेक्षक अंगणवाडी प्रमुख मार्गदर्शक लोकेश खंडारे‌ शि.वि.अ. बीट पारडी केंद्रप्रमुख श्री शंकर तलांडे शिक्षण परिषदेची वैशिष्ट्ये सर्व अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्या संयुक्तपणे शिक्षण परिषद व शैक्षणिक सहविचार योग घडवून आणण्यात आले शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली प्रमुख पाहुणे व शिक्षकाचे स्वागत विद्यार्थी स्वागत गीताने आणि केंद्रातील शिक्षकांच्या वतीने पुष्पगुच्छाने करण्यात आले. “करितो प्रार्थना हे दाता तुझं ” या प्रार्थनेने करण्यात आले.नंतर प्रस्ताविक श्री शंकर तलांडे केंद्रप्रमुख पारडी यांनी केले.तसेच श्रीसुंदर लाल गेडाम सर यांनी विद्यार्थी सुरक्षा कलमे समक्ष व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले.तसेच श्री साठे सर यांनी शिष्यवृत्ती चौथी ते आठवी चे अभ्यासक्रम विषयी मार्गदर्शन केले.तसेच श्री संजय मरापे सर यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अभ्यास समृद्धी आणि खान अकॅडमी विद्यार्थी नोंदणी व अभ्यासक्रम विषय मार्गदर्शन केले.तसेच श्री रणजीत जाधव सर यांनी प्रशस्त ॲप नोंदणी व दिव्यांग माहिती विषयी माहिती सांगण्यात आले.तसेच श्री रामेश्वर जाधव सर यांनी सकारात्मक शिस्त याबाबत 13 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विविध उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच नामदेव गेडाम सर व जंगू रायसीडा सर यांनी बीटातील टूर्नामेंट संबंधित नियोजन केले.

तसेच प्रशासकीय सूचना यात निपुण ॲप वर मुख्याध्यापक नोंदणी व शिक्षकांना वर्ग वाटप करणे तसेच अनेक प्रशासकीय विषयावर सविस्तर मार्गदर्शन आणि सूचना केंद्रप्रमुख यांनी सर्वांना दिल्या.” वंदे मातरम ” या गीताने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री अनुप राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपुर यांनी कले .कार्यक्रमाचे नियोजन श्री किशोर गोंडे सर तर आभार प्रदर्शन श्री संजय जाधव यांनी केले.तसेच शाळेमध्ये चहाची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली.

केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका यांनी खूप खूप सहकार्य केले .त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार दिलीप साखरकर सर शाळेचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवापूर यांनी केले .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये