सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे सत्र 2025 – 2026 मधील सांस्कृतिक महोत्सव दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 03 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित केलेला आहे. सांस्कृतिक महोत्सवांतर्गत दिनांक 29 डिसेंबर 2025 ला सकाळी 7.30 ते 8.30 वाजे पर्यंत ‘स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सन्मा. प्रा. कु. माया मसराम मॅडम आणि सन्मा. प्राचार्या कु. गुडघे मॅडम उपस्थित होत्या. या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. आयशा नानाजी वाघाडे, द्वितीय क्रमांक कु. पूजा बळीराम राठोड तर तृतीय क्रमांक शिवम कोडापे यांनी पटकावला. या स्पर्धेचे आयोजन प्रा. कु.सोज्वल ताकसांडे मॅडम, प्रा. जयश्री ताजने मॅडम, आणि प्रा. शिल्पा कोल्हे मॅडम यांनी केले.
त्यानंतर सकाळी 8.30 ते 11.00 पर्यंत व ‘ देशभक्ती व समाज प्रबोधन ‘ या विषयावर काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील प्राचार्य सन्मा. ताकसांडे सर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कविवर्य प्रा. प्रशांत खैरे, प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय विभाग प्रमुख सन्मा. विजय मुप्पिडवार सर तसेच उद्गघाटक तथा पहिले परीक्षक म्हणून शरद पवार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी सर, दुसरे परीक्षक कविवर्य सन्मा.रवी ताकसांडे आणि तिसरे परीक्षक म्हणून सन्मा. ईश्वर सोयाम, यांनी परिक्षकांची भूमिका उत्कृष्टपणे निभवली. या काव्यवाचन स्पर्धेत एकूण 23 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता असून त्यातील प्रथम क्रमांक कु. कशिशा कुळसंगे , द्वितीय क्रमांक शिवम कोडापे, तर तृतीय क्रमांक रचित कारदोडे यांचा आला. काव्यवाचन स्पर्धेचे आयोजक प्रा. दिनकर झाडे, आणि प्रा. राजेश बोळे होते. या स्पर्धेचे प्रास्ताविक कला / विज्ञान प्रमुख प्रा. प्रशांत खैरे सर यांनी केले
सूत्रसंचालन प्रा. दिनकर झाडे तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक सातारकर सर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. जहीर सर, प्रा. डफाडे सर, प्रा. टेकाडे सर, प्रा. मेहरकुरे सर, प्रा. कु. गहुकर मॅडम, करण लोणारे तसेच सीताराम भाऊ, शशिकांत भाऊ या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



