ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय आष्टेडू स्पर्धेसाठी न. प. गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची झाली निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रश्नात रणदिवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रौडा अधिकारी, वर्धा तथा जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 डिसेंबर, 2025 ला वर्धा येथील सिंचन भवन येथे शालेय विभागीय स्तरीय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात आले होते. सदर स्पर्धेत पीएमश्री नगर परिषद गांधी विद्यालय बल्लारपूर येथील इयत्ता 9 व्या वर्गात शिकणा-या कृष्णा दुर्गवंश या विद्यार्थ्याने शिवकला या कलेत प्रथम स्थान पटकावला. तर अखिलेश वर्मा हया विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, कृष्णा दुर्गवंश याने सदर विभागीय स्पर्धेत प्रथम स्थान मिळविल्याने पुढे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

विभागस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत उत्तुंग यश मिळविल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल बाप, उप मुख्याधिकारी तथा शिक्षण विभाग प्रमुख रविंद्र भंडारवार, शाळेचे मुख्याध्यापक सचिन कडूकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांचे पालकांचे व विद्यायांच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण देणारे क्रीडा शिक्षक स्वप्नील डंबारे यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये