ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परिसरातील 50 आशा सेविकांसाठी प्रेरणादायी उपक्रम; ‘आशा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

डॉ. संकेत शेंडे यांच्या उपक्रमाचे होतंय सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा फाटा :- प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत शेंडे यांच्या पुढाकाराने परिसरातील एकूण 50 आशा सेविकांना नव्याने प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ (ASHA) या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पाहण्यासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले.

हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, आशा सेविकांच्या त्याग, मेहनत, कर्तव्यनिष्ठा आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य सेवेचे वास्तवदर्शी चित्रण करतो. गावपातळीवर आरोग्यसेवा पोहोचवणे, माता–बाल संगोपनात सक्रिय सहभाग, आजारांविषयी जनजागृती, लसीकरण तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी—या सर्व क्षेत्रांत आशा सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

-“आशा सेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा आहेत. त्यांच्या कार्याची समाजाला जाणीव व्हावी आणि त्यांना मानसिक बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ‘आशा’ चित्रपटातून त्यांच्या संघर्षाची आणि समर्पणाची खरी ओळख मिळते.”

-डॉ. संकेत शेंडे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा

-“हा चित्रपट पाहताना आमचे रोजचे अनुभव जणू पडद्यावर दिसत होते. आमच्या कामाची दखल घेतली जात आहे, ही भावना खूप प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे आम्हाला अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते.”- संगीता वानखेडे, आशा सेविका, आवाळपूर

दररोज कठीण परिस्थितीतही न थकता सेवा देणाऱ्या आशा सेविकांचे मनोबल वाढवणे व त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या स्तुत्य व विचारपूर्वक उपक्रमासाठी डॉ. संकेत शेंडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून, आरोग्य सेवेत अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये