ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरिबों के सम्मान में, भाजपा पोंभूर्णा मैदान में – आ. सुधीर मुनगंटीवार

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभूर्णा येथील घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती वाटपाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट

सेवाभावातून घरकुल लाभार्थ्यांना दिलासा

चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभूर्णा येथे ५ ब्रास मोफत रेती वाटप उपक्रमाचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केला. घरकुल लाभार्थ्यांना प्रत्यक्ष दिलासा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद करत “गरिबों के सम्मान में, भाजपा पोंभूर्णा मैदान में” असे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले.

पोंभूर्णा येथे मोफत रेती वाटप उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी भाजपा महिला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपाचे तालुकाध्यक्ष हरीश ढवस,तहसीलदार मोहनीश शेलवटकर,सुलभाताई पिपरे, राहुल संतोषवार,विनोद देशमुख,ज्योतीताई बुरांडे, अजित मंगळगिरीवार,अजय मस्के, रोशन ठेंगणे, बंडु बुरांडे,जितू चुदरी, रवी गेडाम,रवी मरपल्लीवार, जनार्दन सातपुते, राकेश गव्हारे, धनराज सातपुते आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, घरकुल लाभार्थ्यांना मदत करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ही प्रत्येक सच्च्या भाजप कार्यकर्त्याची सामाजिक बांधिलकी आहे. गरिबांच्या सेवेतूनच खरी लोकसेवा घडते. “गरिबों के सम्मान में, भाजपा मैदान में” या भावनेतून कार्यकर्त्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, हीच खरी सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात पोंभूर्णा तहसीलदार आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी यांनी दाखवलेली तत्परता आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दाखवलेला सेवाभाव कौतुकास्पद असल्याचे नमूद करत आमदार मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. गरीबांच्या सुख-समृद्धीसाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते, हीच खरी प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. आजपासून सुरू झालेला हा उपक्रम अनेक कुटुंबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

२०२५ मध्ये सुरू झालेली ही उपयुक्त वाटचाल, २०२६ मध्ये गोरगरिबांच्या हक्कांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भक्कम पायाभूत ठरेल,” असे सांगत आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पुढील काळातही प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी कार्यकर्ते आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने, एकदिलाने काम सुरू ठेवावे. त्यामुळे शासननिर्णयांचा खरा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये