ग्रामसफाईने गाडगे महाराज ६९ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक गौराळा येथील संत गाडगेबाबा समाज मंदिरात संत गाडगेबाबा यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला. महोत्सवा दरम्यान भजन कीर्तन तथा रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा तसेच महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम पार पडले.
या दोन दिवशीय कार्यक्रमात ग्रामसफाई द्वारे परिसर स्वछ करण्यात आला.यावेळी अध्यक्ष किशोर भोस्कर, सचिव उज्वल किनकर, अजय क्षीरसागर,उपाध्यक्ष संजूभाऊ थेटे,सुखदेव पत्रकार,मार्गदर्शक प्रा. अमोल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता पल्लवी ठाकरे, महिला प्रमुख नीता आंबीलकर आणि समाजबंधव हजर होते. त्यानंतर कोषाध्यक्ष संदीप चटपकार आणि रुपाली चटपकार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.सायंसकाळी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.रांगोळी स्पर्धेत शिवानी क्षीरसागर,तेजश्विनी क्षीरसागर तर निबंध स्पर्धेतचैतन्य बूच्चे, जान्हवी बोबडे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक आला. रात्री भजन संध्येचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी गाडगे बाबा स्मृती भवन ते गावराळा परिसर येथे शोभा यात्रा काढण्यात आली. ह. भ. प. सुवर्णा पिंपळकर व प्रकाश पिंपळकर संच यांचे गोपाल काल्याचे कीर्तन करण्यात आले. नंतर बक्षीस वितरण व स्वागत समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये प्रथम द्वितीय तथा तृतीय क्र. मिळवणाऱ्या स्पर्धकांना पल्लवी अमोल ठाकरे तर्फे प्रमाणपत्र, संत पुस्तिका, बौद्धिक पुस्तिका तसेच मंडळातर्फे सन्मानचिन्ह देऊन स्पर्धाकांचा सन्मान करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धाकांना प्रमाणपत्र तसेच भजन मंडळींना मानधन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. बक्षीस वितरण व स्वागत समारंभीय कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष किशोर भोस्कर,भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,कोषाध्यक्ष संदीप चटपकार, सचिव उज्वल किनकर,वरोरा येथील संत गाडगे बाबा मंदिराचे अध्यक्ष हरिभाऊ भाजीपाले, मासळ येथील जेष्ठ नागरिक रमेश क्षीरसागर, कार्याध्यक्ष मधुकर क्षीरसागर,सदस्य मधुकर नांदे,सहकार्याध्यक्ष बंडू भोस्कर,महिला प्रमुख नीता आंबीलकर,उज्वला भोयर, तेजश्विनी क्षीरसागर मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद महाविद्यालय येथील प्रा. अमोल वा. ठाकरे यांनी तर आभार विजय भोयर यांनी मानले.शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



