गॅस गोडाऊनची चोरी करणारे आरोपी निष्पन्न
एकूण 12 लाख 50 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 15/12/2025 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे श्री. सुभाष बहादचंद खत्री वय 65 वर्ष रा. कोचर वार्ड हिगणघाट जि. वर्धा हे दिनांक 14/12/2025 रोजी सायंकाळी 18/00 वा. 15/12/2025 चे 09/25 वा दरम्यान गॅस एजन्सी बंद करून गेले असता त्यांच्या बंद गॅस एजन्सी मध्ये प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने नगदी 3,61,000/- रु अज्ञात इसमाने चोरी करून नेले. अश्या फिर्यादी यांचा तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट अप क्रमांक 1796/2025. कलम 334,303(2) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांने केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत घटणास्थळी भेट देवुन सदर चोरी संबधाने माहिती घेतली असता माहिती मिळाली की एक निळ्या रंगाची बिना नंबर फोर फिरताना दिसली त्यावरून व तांत्रिक माहीती वरून निष्पन्न झालेली हुंडाई अल्टेंड्रा कार क्रमांक यु.पी 78 इ.आर 4455 नंबर ची चोरी करण्यासाठी वापरली असल्याचे समजले वरील वाहन क्रमांकाच्या वाहन मालकाचा शोध घेतल्या असता त्यांनी सांगितले की दिनांक 14/12/2025 रोजी दुपारी 03.30 च्या सुमारास निष्पन्न आरोपी नामे मुकुल सुरेशराव वासनिक (पसार) यांनी किरायाने नेली होती असे सांगितले वरून साक्षीदार यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले नमूद वाहन किंमत 12,50,000/- रुपये चा माल दोन पंचा समक्ष जप्त केले व पुढील तपास कामी पोस्टे हिंगणघाट यांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही – मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक वर्धा, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी,पोउपनि प्रकाश लसुन्ते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि.शुभम राउत, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे वर्धा व सायबर चे दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे वर्धा यांनी केली.



