ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सार्वजनिक उत्सवात शांतता राखा

भद्रावतीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

पोलीस स्टेशन भद्रावती येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष्य नोपानी, तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपिन इंगळे, नगरपरिषद अधिकारी गायकवाड आधी उपस्थित होते सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा इत्यादी सार्वजनिक उत्सवात नागरिकांनी पोलिसांनी सुचित केलेल्या मार्गाने मिरवणूक काढावी ध्वनी प्रदूषण अधिनियम समजावून सांगितले जातीय तेढ निर्माण होईल असे अनुचित प्रकार करू नये.

गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे कोणीही बाहेरील व्यक्ती मिरवणुकीत गोंधळ करत असल्यास याबाबतची सूचना पोलिसांना देण्यात यावी अशा अनेक सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी भाकपा जिल्हा सहसचिव राजू गैनवार, बसपाचे विशाल बोरकर ,उमेश रामटेके, बिपिन देवगडे, शेख रब्बानी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्य आधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये