जि. प. प्राथ शाळा साखरवाहीचे नवरत्न स्पर्धेत घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नुकत्याच पार पडलेल्या केंद्र स्तरीय नवरत्न स्पर्धेत साखरवाही शाळेने पाच स्पर्धेत सहभाग घेऊन पाच ही स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकवून मोठे यश संपादन केले.
यात एकपत्री भूमिका कु. प्रियांशी रासेकर, वादविवाद स्पर्धा हिमांशू ढेंगरे, स्मरणशक्ती स्पर्धा प्रेम सचीन बरडे या सर्वांनी केंद्रातून प्रथम क्रमांक पटकवीला. तर चित्रकला स्पर्धेत राजेश ढेंगरे आणी शुद्धलेखन स्पर्धेत शौर्य डवरे यांनी द्वितीय क्रमांक पटकवून शाळेला यश मिळवून दिले. यावेळी साखरवाही शाळेतून सहभागी सर्व स्पर्धाकांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावून असलेला दिसला.
प्रविण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक रवी सोयाम व दीपक भोपळे यांचे गावाच्या वतीने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. विध्यार्थी शैक्षणिक आणि सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने अतिशय सक्षम असल्याचे प्रतिपादन पालक वर्ग करत असून पाल्याच्या प्रगतीने अतिशय समाधानी आहेत.



