ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्या वादातून शेतकऱ्याचा पाठलाग

जीव मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याचा वाहनाने पाठलाग करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कायम गुन्हा क्रमांक 65/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 126(2), 351(2), 352 व 3(5) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी सुखदेव सखाराम वाघ (वय 65, व्यवसाय – शेती, रा. आमखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता मेव्हणा राजा पाटा परिसरात फिर्यादी जालना येथून आपल्या गावी जात असताना आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्या वाहनास आडवे होण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठलाग करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर रात्री 10.31 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपींमध्ये किशोर अशोक सावळे, अशोक आनंदा सावळे (दोघे रा. चिंचोली बोर, ता. मेहकर) व दत्ता हाडे (रा. बाबुलखेड, ता. लोणार) यांचा समावेश आहे.

सदर गुन्हा पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये