ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री गुरुदेव सेवा मंडळ सागराची नवीन कार्यकारीणी गठीत

युवकांचा सेवेसाठी पुढाकार : ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ग्रामगीताचार्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सागरा या पवित्र भूमी मध्ये कार्यरत असलेल्या सागरा श्री गुरुदेव सेवा मंडळाने आज रोजी पर्यंतअनेक ग्रामोपयोगी कार्य करून” प्रति मोझरी”ही विशेष ओळख निर्माण केली.

    त्या सागरा श्री गुरुदेव सेवा मंडळ सागराची नवीन कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली. या नवगठीत कार्यकारिणीची विशेषता म्हणजे नवयुवकांचा सेवेसाठी पुढाकार होय.

    या कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष प्रेमदास जगन्नाथ वागदरकर,अध्यक्ष प्रवीण दिलीप वागदरकर,उपाध्यक्ष सुनील मारोती उज्वलकर, सचिव प्रफुल तीकाराम येवले, सहसचिव मारोती बापूराव बांदुरकर, कोषाध्यक्ष हनुमान भाऊराव रासेकर, सल्लागार विनोद महादेव बांदुरकर, सदस्य म्हणून महादेव मारोती मांडवकर, चंपत यादव सरोदे,प्रदीप देविदास बदखल,बबन राघोजी नौकरकार, रसिका गजानन मारेकर, सोनाली कैलास पेंदोर यांचा समावेश आहे.

 येणाऱ्या काळामध्ये अनेक समाजोपयोगी कामे करून समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा संकल्प नवगठीत कार्यकारीणीने यावेळी केला.

        अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध झालेल्या कार्यकारणीच्या निवडीबद्दल सागरा श्री गुरुदेव सेवा मंडळ सागराचे सर्व माजी पदाधिकारी, सुसंस्कार शिबिर सागराचे सर्व पदाधिकारी, काशीविश्वेश्वर देवस्थान समिती सागरा चे सर्व पदाधिकारी आणि गावकरी मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये