तेलंगण स्टेटमध्ये दिलीपराव वावरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तुकूम चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव वावरे यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट) येथे संपन्न झाले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री. दिलीप वावरे सामाजिक व शैक्षणिक कार्यात असून चंद्रपूर येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगृहाचे ते सचिव आहे. धम्मगिरी वन उद्यान समिती मानाटेकडी चे अध्यक्ष, बहुजन हिताय चॅरिटेबल ट्रस्ट पद्मापूर चे अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन चे जाईंट सेक्रेटरी, संचालक बहुजन हिताय नागरी सहकारी पतसंस्था,संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, चंद्रपूर, अध्यक्ष इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आदी महत्त्वाच्या पदांवर असून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व रूजवण्यासठी प्रयत्न करीत आहे, हे विशेष. पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. प्रतिभा धानोरकर यांनी अभिनंदन केले आहे.



