शासनाने शेतकयांच्या कर्ज माफीची प्रक्रिया सुरू केली आहे – आमदार. मा. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया
वरोरा येथे मान्यवरांचा सत्कार, कर्ज धोरण पुस्तीकेचे प्रकाशन व प्रक्षिशण शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट
कार्यकमाचे उद्घाटक चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी विदर्भातून रविंद्र शिंदे हे हुशार कुशल आणि उतम प्रशसक म्हणून चंद्रपूर जिल्हा बँकेची धुरा साभाळत आहेत. शेतकरी बांधव महिला बचतगट व इतर सर्व ग्राहाकांसाठी बँक चांगले कार्य करीत आहे. कामात सुसुत्रता आणण्यासाठी प्रकाशित झालेली बँकेची कर्ज धोरण पुस्तीका महत्वाची आहे. शासनाने कर्ज माफीची प्रक्रिया सुरू केली असुन बँकाना आदेश दिल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्र श्रीनीवासराव शिदि यांनी कर्ज माफी गरजवंत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. चकित पिक कर्जदार शेतकरी बांधवासाठी व्याज सवलतीची सामोपचार कर्ज फेड योजना कार्यन्वीत करणारी चंद्रपुर जिल्हा बँक राज्यातील पहीली जिल्हा बँक आहे. जलद गतीने ग्राहकांना सेवा मिळण्यासाठी बँकेने कर्मचान्यांच्या सेवा नियमात बदल केले. सोप्या आणि सरळ पद्धतीने नविन कर्ज धोरण तयार केले. राज्याला सहकाराची मोठी परंपरा लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पासुन शरद पवार यांच्या पर्यंत आहे. सहकाराच्या मजबुतीसाठी संस्थांचे एकत्रीकरण गरजेचे असल्याचे मत मांडले.
दिः ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा येथील शेतकरी भवनात चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व चंद्रपुर जिल्हा देखरेख सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर, खासदार तथा बँकेच्या संचालीका मा. श्रीमती. प्रतीभाताई धानोरकर, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करण देवतळे, उद्योजक. मा.प्रकाशबाबु मुथा यांचे ही समायोचित भाषणे झाली.
बँकेचे उपाध्यक्ष मा. संजय डोंगरे, संचालक सर्व श्री. रोहीत बोम्मावार, निशीकांत बोरकर, दिनेश चोखारे, डॉ. ललीत मोटघरे, गणेश तर्वेकर, जयंत टेमुर्डे, संचालीका सौ. नंदाताई आल्लुरवार आणि कृषी उ.बा. समीती वरोराचे सभापती डॉ. विजय देवतळे, कृषी उ.बा. समीती भद्रावती चे सभापती राजु टोंगे, जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकुर नाबार्ड चंद्रपुर चे विकास व्यवस्थापक तूणाल फुलझेले, प्रशिक्षक नरेंद्र पिंपळकर, डॉ. प्रशांत शिर्के, डॉ. सिमा मिश्रा, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकरी राजेश्वर भि. कल्याणकर, चंद्रपुर देखरेख संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकरी गणेश काळे यांच्या सह मोठया संखेने संस्थांचे संचालक, सचिव आणि सहकारातील जाणकार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार शाल राष्ट्रसंताची ग्रामगिता व भगवी टोपी देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमात सुरवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पीत करण्यात आली.



