ताज्या घडामोडी

भद्रावती तालुक्यात 58 टक्के मतदान

मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली असून दिनांक 20 रोज बुधवारला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 58% मतदान झाले आहे. आज दिनांक 20 रोज बुधवार ला सकाळी 7.00 वाजता पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. शहरातील तथा तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. शहरात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसत नव्हती.

सदर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलीसांनचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विधानसभा क्षेत्रातील एकूण 18 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंदिस्त झालेले आहे. यात भाजपचे करण देवतळे, महाविकास आघाडीचे प्रवीण काकडे तसेच शिवसेना उभाठा बंडखोर मुकेश जीवतोडे यांच्यासोबत अन्य उमेदवारांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये