Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्या निकेतन शाळेच्या विदयार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षा मार्च-२०२४ मध्ये सुयश

श्री जैन सेवा समितीच्या वतीने शाळेतील सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट

दहावीच्या नागपूर बोर्डाच्या परीक्षेत श्री जैन सेवा समितीव्दारा संचालित विद्या निकेतन शाळा, दादावाडी, चंद्रपूर येथील विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केल्या बद्यल श्री जैन सेवा समितीच्या वतीने शाळेतील सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शाळेतून कु. देविका बोंडे ही विदयार्थीनी 92.60% गुण घेवुन शाळेतून प्रथम आली. शाळेतून दहावीच्या परीक्षेत 67 विदयार्थी प्रविष्ठ झालेले असुन त्यापैकी 67 विदयार्थी उत्तीर्ण झाले व शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100 टक्के लागला असुन यापैकी 45 विदयार्थी 75% च्या वरती गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.

श्री जैन सेवा समितीचे अध्यक्ष श्री. राज रणजीत पुगलिया, सचिव श्री. दिलीप खंजाची, कोशाअध्यक्ष श्री. दिपक पारख, संचालक श्री. प्रमोद मुथा, अॅड. श्री. विजय पुगलिया, सल्लागार श्री. संदीप बांठिया, प्रशासक सौ. बवानी जयकुमार तसेच श्री. जयकुमार सर व शाळेच्या मुख्याध्यापिका कु. राजश्री गोहोकार, यांनी गुणवत्ता प्राप्त विदयार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये