सखीचा धनोजे कुणबी समाज मंदिर मंदिर तर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर येथील धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर तर्फे नुकताच सखी पांडुरंग दोरखंडे हिचा अंडर 15 वर्ल्ड स्कूल हॉलिबॉल चॅम्पियनसाठी नुकत्याच चायना येथे पार पडलेल्या टीम इंडियामध्ये प्रतिनिधित्व केल्याबद्दल रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जावून सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज मंदिराचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, उपाध्यक्ष संजय ढवस, सचिव अतुल देऊळकर, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर काकडे, सदस्य रवींद्र झाडे, अँड. देवा पाचभाई, मनिषा बोबडे, सरदार पावडे, दीपक जेऊरकर, रणजित डवरे, कोमल मोहितकर उपस्थित होते.
सखी चांदा पब्लिक स्कूल येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. सखीने भारतीय संघात चायना मकाऊ, बल्गेरिया, युगांडा या तीन देशांसोबत विजयश्री प्राप्त केली.
यापूर्वी सखी ओडिसा भुवनेश्वर येथे झालेल्या 14 वर्षांखालील मुलींच्या हॉलिबॉल स्पर्धेत नॅशनल गोल्ड प्राप्त केले. तिच्या या यशामुळे सखी ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय हॉलिबॉल खेळाडू ठरली. सखीचे वडील हॉलिबॉलपटू असल्याने त्यांनी सखीतही तिच आवड निर्माण केली. तिने आपल्या यशाचे श्रेय वडिलांसोबत तिचे मार्गदर्शक संदीप चुके व आई सुरेखा यांना दिले. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



