ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनिकगड सिमेंट वर्क्स गडचांदूर द्वारा ई कचऱ्याची विल्हेवाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माणिकगढ सिमेंट आपल्या कार्यस्थळी काम करत असणाऱ्या नागरिकांची व त्यांच्या कुटुंबाची सर्व बाजूने काळजी घेत असते.

त्यासाठी नवनवीन उपक्रम माणिकगड सिमेंट द्वारा राबविले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून ई आर हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ई कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे उपक्रम नुकताच माणिकगढ सिमेंट च्या रहिवाशी कॉलनी परिसरात राबविण्यात आला

या उपक्रमात कॉलोनीतील प्रत्येक घरातून ई कचरा जमा करण्यात आला व त्यापासून होणारे फायदे व नुकसान यांवर मार्गदर्शन कॉलोनी रहिवाशी्यांना करण्यात आलेत.

या ई कचऱ्यात जुने कूलर, कॉम्प्युटर, बॅटरी,प्रेस, ओव्हन, मोबाईल, डिश छत्री, इलेक्ट्रिक केबल्स, ट्यूब रोड्स, वॉशिंग मशीन या वस्तूंचा समावेश असून एकूण 500 किलो च्या जवळपास ई कचरा जमा करण्यात आलात.

यावेळी बोलतांनि नवीन कौशिक यांनी सांगितले कि ई कचरा जमा करून आपण आपल्या पृथ्वीला सुरक्षित व हिरवेगार ठेवण्यासाठी मदत होईल.

या उपक्रमाला यशस्वी करण्या करिता माणिकगढ सिमेंट च्या ऍडमिन टीमचे बाबू राजन, मानस बेहरा,विजय सिंग तसेच ई आर चे परवेज, विनोद ठोंबरे, शंकर बिश्वास,समरेश सिंग, अरविंद तिवारी, प्रमोद खंडपाल,पुषपेंद्र दुबे व सेक्युरिटीचे अभिषेक यांनी मिळून प्रयत्न केलेत.

कॉलोनीतील लोकांनी या उपक्रमाची स्तुती केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये