नागपूर येथे WCL च्या CMD यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट
घूग्गुस लोखंडी पुलासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट
घूग्गुस शहरातील अत्यंत महत्त्वाचा लोखंडी पूल मागील दोन वर्षांपासून रहदारीसाठी बंद असल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पुलामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे CMD जय प्रकाश द्विवेदी यांची तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुघुस शहरातील नागरिक, व्यापारी व कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या अडचणी मांडत पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत CMD शजय प्रकाश द्विवेदी यांनी लोखंडी पुलाच्या कामासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हा निधी २४ तासात संबंधित यंत्रणेकडे वर्ग केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून पुलावरून वाहतूक बंद ठेवावी लागली होती. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने पुलाच्या कामाला पुन्हा गती मिळणार असून लवकरच पूल रहदारीसाठी खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे.
या भेटीमुळे घुघुस शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे. नागपूर येथे WCL च्या CMD यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट; घुघुस लोखंडी पुलासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो निधी अपुरा ठरल्याने पुलाचे काम अर्धवट राहिले होते आणि त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून पुलावरून वाहतूक बंद ठेवावी लागली होती. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने पुलाच्या कामाला पुन्हा गती मिळणार असून लवकरच पूल रहदारीसाठी खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे.
या यशस्वी भेटीमुळे घुघुस शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
या भेटीदरम्यान WCL चे डायरेक्टर (HR) डॉ. हेमंत पांडे, तसेच WCL HMC चे प्रेसिडेंट शिवकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपुरात लवकरच होईल इको पार्क, सीएमडी यांच्याशी केली चर्चा
चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक आणि नागरिकांना विरंगुळा मिळावा या उद्देशाने इको पार्क उभारण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नुकतीच प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. त्यानंतर नागपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएमडी श्री. जयकुमार द्विवेदी यांची भेट घेतली. या भेटीत इको पार्कच्या नियोजन, प्रगती आणि आवश्यक प्रक्रियांबाबत सविस्तर चर्चा करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चंद्रपूरमध्ये लवकरच आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा इको पार्क साकार होईल, असे सकारात्मक आश्वासन सीएमडी श्री. जयकुमार द्विवेदी यांनी दिले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूरच्या पर्यावरण संवर्धनास चालना मिळून नागरिकांसाठी एक नवे आकर्षण निर्माण होणार आहे.



