ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा भर पावसात जिवती येथे भव्य मोर्चा

अनेक ज्वलंत मागण्यांसाठी जिवतीवासीयांचा एल्गार

चांदा ब्लास्ट

शेतकरी आणि जीवती तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने निर्णय घेऊन तातडीने न्याय द्यावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जीवती तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघटनेने या मोर्चाला पाठींबा दिला होता. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे यांनी केले.
              दिनांक २१ सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी एक वाजता भर पावसात जिवती वाशियांचा मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,रामनगर मार्गे जिवती ते तहसिल कार्यालयावर गेला. विशेष म्हणजे बंजारा वेष परिधान केलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपला आवाज बुलंद केला.
           मोर्चेक-यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून तीन पिढयांची अट रद्द करुन जिवती तालुक्यातील भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीनपट्टे द्यावे, जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करावे, जिवती येथे न्यायालय सुरु करावे, जिवती येथे बसस्थानक तात्काळ मंजुर करावे, जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची निधी तात्काळ जमा करण्यात यावी, नगरपंचायत जिवती येथे मंजुर असलेले रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे, जिवती तालुक्याच्या विकास कामांसाठी लागणारी वनविभागाची विविध (एनओसी) अट रद्द करावी, जिवती येथे भारतीय स्टेट बँक शाखा तात्काळ मंजुर करावी, नगरपंचायत जिवती येथील पंतप्रधान आवास योजनेतील मंजुर असलेले ६६४ घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी तात्काळ देण्यात यावी, जिवती तालुक्यातील अतिक्रमणधारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्वे करुन देण्यात यावे, जिवती तालुक्यातील सर्व गाव तांडयामध्ये सर्वे करुन गावठाणा वाढवून तात्काळ देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
            मोर्चात विशाल राठोड, सय्यद ईस्माईलभाई, देविदास वारे, शब्बीर जहांगीरदार, गणेश कदम, तुकाराम सिडाम, विनोद पवार, अरविंद चव्हाण, सुनिल राठोड, नरसिंग हामने, लक्ष्मण पवार, रामेश्वर नामपत्ले, सायसराव कुंडगीर, मेरबान चव्हाण, बालू जाधव, दत्ता केजगीर, प्रविण राठोड, अजय पवार, कपिल जाधव, विजय चव्हाण, रामदास चव्हाण, रामेश्वर पोले, रियाज सय्यद, प्रेमदास राठोड, किरण राठोड, प्रसाद राठोड, राजेश चव्हाण, उध्दव गोतावळे, रविंद्र मानकर, नितेश वाघमारे, मिथुन जाघव, रघुनाथ पोले, संतोष राठोड, मारोती जाधव, लक्ष्मण खुटेकर, कर्मा कांबळे, मचिंदर कांबळे, राजाराम कांबळे, अशोक नामपत्ले, गंगाधर तोगरे, उत्तम राठोड, धोंडकर, पंढरी कांबळे, छगन जलपतराव पेंदोर, डुकरे सर, नारायण पवार, माधव शिंदे, बाबु गिरमाजी, धनाजी पाटील, बापुराव आमनर, निकोरे भारी, तुकाराम सिडाम, देवू आत्राम, मारोती सिडाम, झाड़ू कोडापे, झाड़ू आत्राम, जैतु पाटील, मारु पाटील, नानाजी मडावी, विष्णु कांबळे, मंगेश सोयाम, लच्चु सोयाम, विठ्ठल आडे, बालु पवार, शंकर राठोड, गणेश राठोड, उल्हास राठोड, दगडू पवार, अनिल चव्हाण, व्यंकटी जाधव, रमेश पवार, प्रकाश राठोड, बळीराम पवार, डिगांबर जाधव, सय्यद जमीर, शेख वजीर, बालु नरवाडे, अंकुश देवकते, बाबू पवार, अनिल राठोड, मिथुन जाधव, रोहिदास चव्हाण, अंकुश जाधव, अर्जुन सिडाम यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक सहभागी झाले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये