१६ ला तिरळे कुणबी समाजाचा विदर्भ स्तरीय उपवधू-उपवर मेळावा

चांदा ब्लास्ट
तिरळे कुणबी समाज संस्था, भद्रावती जि. चंद्रपूर यांच्या वतीने रवीवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, स्थळ – श्री मंगल कार्यालय, मेन रोड, भद्रावती जि. चंद्रपूर येथे वेळ – सकाळी १०.०० वा. तिरळे कुणबी समाजाचा उपवर-उपवधू परिचय मेळावा आयोजित केलेला आहे.
तरी विदर्भातील सर्व समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसे या मेळाव्यामध्ये वधू-वरांची परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष स्थानी श्री. देविंद्र शिंदे, संस्थापक रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. अशोकराव घारफळकर, प्रमुख वक्ते श्री. प्रविण देशमुख प्रबोधन कार्य यवतमाळ, सन्मानीय अतिधी श्री. सुरेशराव गुडघे पाटील संस्थापक बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश नागपूर), श्री. नरेंद्र पाटील ठाकरे (पोंझुर्णीकर, वरोरा), श्री. किशोरभाऊ माथनकर ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व, वर्धा, प्रा. सुरेखाताई देशमुख, पल्लवी प्रदिपराव आखरे तहसिलदार चंद्रपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
तरी तिरळे कुणबी समाज बांधवांनी या होऊ घातलेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मेळाव्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन तिरळे कुणबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष मोहन चौधरी, दिलीप रिंगणे, भद्रावती तालुका अध्यक्ष मोहन पवार, सचिव अमोल दौलतकर, वसंता मानकर, छत्रपती राऊत, कृष्णाभाऊ इंगळे, प्रशांत इंगळे, अमोल गावंडे, रवी देऊरकर, अविनाश सोनटक्के, विजय पवार, दत्ताभाऊ कोंबे, ओंमकार मोघे यांनी एका पत्रकार द्वारे कळविले आहे.