ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांचे जोरदार स्वागत.

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:- सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार  प्रफुल पटेलजी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत समाविष्ठ होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नाकरीता संघर्ष करीत आला आहे. यामुळे जनतेचे प्रश्न व अनेक विकासाची कामे सत्तेत मार्गी लावता येतात. असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.

आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक श्रमिक पत्रकार भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खा. प्रफुल पटेलजी यांची आगामी काळात चंद्रपूर येथे होणाऱ्या बैठकी संदर्भात चर्चा करून आढावा घेण्यात आला.

 राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल त्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांची निवड करून अजित दादा पवार, प्रफुल पटेलजी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. पक्षात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्यात पक्षाचा विस्तार व मजबुती करीता आपण सर्र्वांनी मिळून प्रयत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष कोमील मडावी यांनी केले असुन प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले. तसेच स. आबीद अली, राजीव कक्कड, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल यांनी विचार मांडले यावेळी ग्रामीण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महीला पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, केतन तुरकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सहसचिव आबिद अली, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चिमुर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष अविनाश राऊत, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, महिला कार्यध्यक्ष चारूशीलाताई बारसागडे, नगरसेवक महेंद्रसिह चंदेल, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, रौनक ठाकूर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष गितेश सातपुते, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठूने, सचिव रमेश कऱ्हाडे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष नोगेश बघमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, कार्याध्यक्ष तणवीर शेख, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रकीब शेख, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, घुग्गुस शहर अध्यक्ष रवी डिकोंडा, जिल्हा सचिव हर्षवर्धन पिपरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी नगरसेवक सरफराज शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नौशाद सिद्धिकी, ओबीसी शहर अध्यक्ष विपिन झाडे, अश्विन उपासे, प्रविण काकडे, प्रशांत झामरे, अकबर खान, दामोधर नंनावरे, मनोज सैनी, अर्चनाताई बुटले, सलीम शेख, गोलू डोहने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमोल ठाकरे, केतन जोरगेवार, रोशन फुलझेले, तिमोती बंडावार, अनुकूल खन्नाडे, राहुल आवळे, आकाश निरथवार, दिपक गोरडवार, संजय सेजूळ, अमर गोमासे, पियुष चांदेकर, समीर शेख, अमर धोंगडे, गणेश बावणे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, राजू रेड्डी, राकेश रेप्पेलीवार, सचिन मांडाळे, भोजराज शर्मा, राहुल वाघ, पवन जाधव, प्रतीक भांडवलकर, सनी शर्मा, ऋतिक मडावी, संदीप बिसेन, निशांत लिंगमपल्लीवार, अंकित ढेंगारे, पवन बंडीवार, चेतन अनंतवार यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये