वक्फ मालमत्ता नोंदणीसाठी लाभार्थ्यांना मोठा दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती:- केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ (दुरुस्ती) अधिनियम २०२५ अंतर्गत उम्मीद पोर्टलवर मालमत्ता नोंदणीबाबत एक अतिशय महत्त्वाच्या निर्णय जाहीर केला आहे.
शासनाने मोठी सवलत जाहीर केली आहे की, सहा महिन्याची मुदत संपल्यानंतरही पुढील तीन महिने कोणताही दंड आकारण्यात येणार नाही किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही.
या कालावधीत म्हणजे, मार्च २०२६ पर्यंत मुतवल्ली किंवा वक्फ संस्थेसाठी नोंदणी करणाऱ्यांना पूर्ण दिलासा मिळेल.
शिवाय वैयक्तिक अर्ज प्रत्येक राज्यातील वक्फ न्यायाधीकरणाकडून आणखी सहा महिन्यासाठी वाढवले जाऊ शकते.
ही सवलत मिळविण्यासाठी मी स्वतः मंत्री किरेन रिजिजू यांना तहसीलदार जिवती यांच्या मार्फतीने निवेदन पाठविले होते आणि ही मागणी निवेदनातून केली होती. देशातून ज्यांनी ज्यांनी या नोंदणीसाठी प्रयत्न केले. त्या सर्वांमुळे आज हा सामूहिक प्रयत्न यशस्वी झाल्याबद्दल मला व भारतातील तमाम मुस्लिम बांधवांना आनंद झाला आहे.
देशातील अंदाजे ९ लाख वक्फ मालमत्तांपैकी १.५१ लाख मालमत्तांची आतापर्यंत पोर्टलवर नोंदणी झाली आहे. ही नोंदणी अद्याप प्रलंबित असलेल्या सर्वांच्या सोयीसाठी हा निर्णय अतिशय खुप महत्त्वाचा ठरला आहे. उम्मीद पोर्टल हे वक्फ मालमत्तांचे जिओ- टॅगिंग, दस्ताएवज पडताळणी आणि पारदर्शक व्यवस्थापनासाठी सरकार-विकसित अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
या निर्णयामुळे कोट्यावधी मुतवल्लींच्या समस्या सुटतील. केंद्र सरकार आणि मंत्री किरेन रिजिजू यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
सर्व मुत्तवल्ली बंधू-भगिनींना विनंती या विषय सवलतीच्या लाभ घ्या आणि पुढील तीन महिन्यात आपल्या मालमत्तेची नोंदणी पूर्ण करा असे आव्हान-सय्यद शब्बीर जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका जिवतीच्या वतीने करण्यात येत आहे.



