पदोन्नतीत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्यावर अन्याय
चंद्रपूर जिल्ह्य़ातच रिक्त पदे असतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले कोकणात पुण्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
महाराष्ट्र राज्यात विदर्भ नागपूर विभागात आजही ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शेकडो पदे निरंतर रिक्त आहेत.
मागच्या 50 वर्षापासून बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागात अनेक ठिकाणी अतिदुर्गम नक्षलग्रस्त कठीण डोंगराळ भागात अविरत निरंतर अखंड आरोग्य सेवा देत आहेत. ग्रामीण भागात जिथे एमबीबीएस झालेले विद्यार्थी आरोग्य सेवा द्यायला नकार देतात तिथे बर्याच ठिकाणी बीएएमएस झालेले विद्यार्थी आरोग्य सेवा देत आहेत. राज्यात 30 वर्षापासून बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आस्थापना ,पदोन्नती विषय प्रलंबित आहेत .
2009 ला अस्थायी वैद्यकीय अधिकारी 1300 पैकी 1200 एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन झाले
परंतू फक्त 79 बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट अ मधे समावेशन झाले
2009 च्या नंतर तब्बल 10 वर्षानंतर अनेक अडचणी कठीण संघर्षांत 2019 ला 718 अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट ब मधे समावेशन करण्यात आले
मागच्या 30 वर्षात शासन प्रशासनाकडून बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधीही पदोन्नतीत देण्यात आलेली नव्हती.
तीन वर्षा आधी काही लोकांनी न्यायालयात जाऊन पदोन्नती चा हक्क मागितला.
2023 नंतर पहिल्यांदाच राज्य आरोग्य प्रशासनाकडून बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता शासकीय प्रक्रिया सुरु करण्यात आली .
दोन वर्षाच्या कठीण संघर्षांतुन पदोन्नती प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 ला अंतिम टप्प्यात आली.
आरोग्य भवन मुंबई येथे 196 बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती प्रक्रियेची मुलाखत पार पडली.
पंरंतु चन्द्रपुर गडचिरोली गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम दुर्गम कठीण भागातील लोकांना विभागीय संवर्ग वाटपात नागपूर विभाग व सुट न देता कोकण विभाग व पुणे विभागात देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी महासंघ (बीएएमएस गट ब) संघटनेकडून मा.मुख्यमंञी महोदय यांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे की चन्द्रपुर गडचिरोली गोंदिया जिल्ह्य़ातील 15 वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक वेळ ची विशेष बाब म्हणून विभागीय संवर्ग वाटपात सुट देण्यात यावी. आणि पदोन्नती पदस्थापना आहे त्या जिल्ह्यातच देणे. जेणेकरून नागपूर विभागात रिक्त पदे राहणार नाहीत.



