महाराष्ट्र ऑलम्पिंक संघटनेच्या सदस्यपदी नियुक्ती बद्दल डॉ. राकेश तिवारी यांचा सत्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्हातील क्रिडा क्रांती तयार करून जिल्हाचे नविन इतिहास तयार करणारे गोंडवाना विघापिठ क्रिडा समिती चे सदस्य डॉ. राकेश तिवारी यांची महाराष्ट्र ऑलम्पिंक संघटनेच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल येथील बहुउद्देशीय विघार्थी बास्केट बॉल क्लबच्या वतिने नुकतेच स्थानिक होटल सनी पॉईट येथे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बी. प्रेमचंद होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुउद्देशीय विधार्थी बास्केट बॉल क्लबचे अध्यक्ष डॉ. दिलीप बगडे, सेवानिवृत क्रिडा शिक्षक दिलीप मोडक, क्रिडा शिक्षक सुनिल दैदावार आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते. यावेळी डॉ. बी. प्रेमचंद आणि डॉ. दिलीप बगडे यांच्या शुभ हस्ते सत्कार मुर्ती डॉ. राकेश तिवारी यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमोल बडकेलवार, विघा किन्नाके,विलोक बडवाईक, शशांक गेडाम या खेळाडुंनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलोक बडवाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन विघा कि न्नाके हि ने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी कोमल वाकडे, आदिक शेख, दिनेश धानोरकर, इशान शेख, नेहाल डांगे, अमरभंडारवार संजय बेलेकर, कोमल शिंगाडे, आदिनी सहकार्य केले.



