एमएसपीएम ग्रुप तर्फ श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संपन्न

चांदा ब्लास्ट
संतांचे कार्य मानव समाजासाठी असते, थोर संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले. महाराजांची बुद्धिमत्ता फार मोठी होती, श्री. संत तुकाराम महाराजांचे अभंग जतन करण्याचे कार्य संताजी महाराजांनी केले.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुपच्या आवारात मागील काही वर्षाअगोदर उभारण्यात आलेल्या जगदगुरु श्री. संत तुकाराम यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य देवात श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांचा पूर्णांकित पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस आंबटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत मोठ्या उत्सहाने जयंती साजरी करण्यात आली.
संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर शिक्षण सम्राट तथा संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एस आंबटकर यांनी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या सर्वाना शुभेच्या हि देण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एस आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे, उपप्राचार्य अनिल खुजे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.



