ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर भद्रावती व श्री हनुमान जन्मोस्तव समिती भद्रावती तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शहरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कराटे पटू सेंसाई मास्टर स्वर्गीय प्रकाश कोवे तथा सेमफाई मास्टर मुन्ना शर्मा यांच्या स्मुर्ती पित्यर्थ ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर भद्रावती व श्री हनुमान जन्मोस्तव समिती भद्रावती तर्फे दिनांक ९ डिसे. रोज मंगळवार ला सकाळी १० ते ०२ वाजे पर्यंत शिंदे हॉस्पिटल समोर हनुमान मंदिर परिसर मेन रोड भद्रावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या विविध कार्यक्रमाला पंधरा ते सोळा वर्ष होत आहे.
आपल्या जीवनाच्या अल्पकाळात भाद्रवतीत आत्मसरंक्षण करण्याचे दृष्टीने प्रेरणा त्यांनी दिली भद्रावती शहरात व तालुक्यात ते प्रख्यात होते व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते लोकांसमोर आले होते त्यानीं बरेचदा लोकांच्या समस्याचें निवारण केले तालुक्यातील युवापिढीला आढवण राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे रक्तदान हे सगळयात श्रेष्ठदान असून एक महत्वाचे राष्ट्रीय सामाजिक कार्य आहे.
या रक्तदानामुळे अनेक गरजूनां जीवनदान मिळत असते रक्तदान केल्याने दुष्परीनाम होत नाही यामुळे या रक्तदान शिबिरात सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, क्रीडा संघटना, व्यापारी संघटना, ऍटो संघटना व इतर संघटनानी तथा शेकडो युवक -युवतीनी सहभागी व्हावे असे आव्हान मनीष सारडा, विजय ठेंगे, सतीश वनकर, अनिल मोडक पवन हूरकट, राजू गैनवार, रत्नाकर साठे प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, विनोद वानखेडे, अनिल डोये, विलास दाते, प्रशांत बरडे, राजू डाखरे, प्रशांत इंगळे, मोहन कोवे, डॉ. नितीन सातभाई, सुभाष पिदूरकर, ललित कोलते, श्रीराम रुयारकर, संतोष लामकासे, विनोद रुयारकर, शैलेश बंडावार, अशपाक अली अमित शर्मा, जय पचारे, निलेश जैन, रितेश वनकर, अमोल भडगरे इत्यादी समितीच्या पदाधिकारी व सदस्यानी केले आहे.



