राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा गोंदिया येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चमक दाखवली.
विद्यार्थी अरुण गंगाराम शिवरकर आणि मयुरी थेटे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत कांस्य पदक पटकावले. त्यांना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेश खांडेभराड व सचिव भूषण शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवले होता ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे तसेच राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



