ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना : ग्रामीण रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धासुमन अर्पण करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जीवने यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. श्रीनाथ तुकाराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे पुष्पहार, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.

याप्रसंगी डॉ. संजय जीवतोडे, डॉ. राहुल गुडापे, डॉ. केतन टाकडे, डॉ. आकाश दीक्षित, डॉ. आकाश पाटमासे, डॉ. विनोद राठोड, डॉ. हिरालाल राठोड, डॉ. विनोद झिंगरे, डॉ. अर्पित खरे, डॉ. नितीन उरकुडे, ललिता चव्हाण, प्रीती मेश्राम, दिपाली वाढई, अनिता मारूलू, वंदना चेनुलवार तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचे संदेश सर्वांनी आचरणात आणावेत, असे आवाहन डॉ. आकाश जीवने यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व श्रद्धामयी वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये