ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्त जयंतीचा सोहळा श्रद्धा, सेवा व सद्भावनेचा संदेश देणारा – आ. जोरगेवार

नेहरू नगर येथे दत्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

नेहरू नगर येथील श्रीदत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त आयोजित पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. टाळ-मृदंग, ताशा, लेझीम आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारून गेला होता. या सोहळ्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेतले.

  या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना आमदार जोरगेवार म्हणाले की, दत्त जयंतीचा सोहळा श्रद्धा, सेवा व सद्भावनेचा संदेश देणारा आहे. आज मी श्रीदत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली आहे.

 ते पुढे म्हणाले, चंद्रपूरमध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करताना मला दत्त महाराजांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहीला आहे. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि आत्मिक ऊर्जा वाढते. दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. संध्याकाळी दीपोत्सव, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नागरीक, महिला मंडळे, युवा गट तसेच विविध सामाजिक संस्थांनी सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये