श्रीसंत झिंगुजी महाराज यांचा ८६ वा पुण्यतिथी महोत्सव यशस्वीरित्या संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने आयोजित केलेला दोन दिवसीय श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८६ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापना व पूजा आरतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. नगर स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर, भक्तीगीतांचा कार्यक्रम, हरिपाठ, भजन संध्या व ह.भ.प. अक्षयपाल महराज आगर यांचे जाहीर कीर्तन यासह संध्याकाळी जागृती भजनाद्वारे दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमास राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, तहसीलदार बालाजी कदम, तसेच अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा व आरती, भजन, ह.भ.प. आशिष महाराज मानुसमारे यांचे गोपाल काल्याचे कीर्तन, दहीहंडी, भजन दिंडीसह पालखीची भव्य मिरवणूक भद्रावतीच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली. सायंकाळी भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या महोत्सवात हजारो भाविकांनी सहभाग दर्शविला.आयोजन समितीने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यतिथी महोत्सव यशस्वीरित्या साजरा केल्याबद्दल आभार मानले.



