ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे साजरा करण्यात आला.

आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी मामा होते, सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी रमेश गवई, प्रा.अशोक डोईफोडे प्रा.विजय रायमल, प्रकाश खांडेभराड, गोविंदराव अहिरे,प्रकाश,अहिरे शांतिलालजी निरफळे,प्रा विठ्ठलराव टेकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी अरुण सपाटे, पंडितराव पाथरकर,मधुकर धुळे, उपस्थित होते. संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गोविंदराव बोरकर यांनी केले राष्ट्रगिताने कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये