ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद लालगुडा शाळेत प्रवेशोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : कोरपना तालुक्यातील लालगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांची गावातील प्रमुख रस्त्याने सजलेल्या बैलगाडीवर चिमुकल्यांना बसवून लेझिम पथकासह प्रभातफेरी व प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.त्या सोबतच नवागताचे स्वागत ,आरोग्य तपासणी,शालेय पुस्तके व गणवेश वाटप तसेच लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग,पाणी बॉटल,नोटबुक,इत्यादी शालेय साहित्य देऊन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या.

शासन नियमा नुसार शाळेत टेबल रचना करून विविध कृती घेण्यात आल्या.या कार्यक्रमाला कोरपना तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंभे ,श्री.शेंडे वैद्यकीय अधिकारी नांदा,विकास भंडारवार पं.स. कोरपना यांनी शाळा भेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळा विकासासाठी मनापासून प्रयत्न करणारे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे व शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड व यांना सहकार्य करणाऱ्या सर्व गावकरी मंडळीचे अभिनंदन केले.

        अशाप्रकारे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने घेण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये