महात्मा गांधी विद्यालय येथे शिवजन्मोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव धनंजय पाटील गोरे उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य साईनाथ मेश्राम, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ. विना देशमुख उपस्थित होत्या. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रा. प्रदीप परसुटकर , श्री पांचाळ सर ,श्री लाड सर, श्री जाधव सर , श्रीमती वैशाली हेपट यांनी प्रकाश टाकला, याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर पोवाडा कुमारी पांचाळ या विद्यार्थिनीने सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवामन टेकाम यांनी केले व आभार सौ दुर्गे मॅडम यांनी मानले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.