जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले शेतकऱ्याचे वास्तव जीवन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लखमापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मुलाखत घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनातील वास्तव, शेतीतील आव्हाने आणि आधुनिक उपाययोजना यांची थेट माहिती मिळाली.
शेतकऱ्यांनी हवामानातील अनिश्चितता, पावसाचा अभाव आणि बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.
– ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. – शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजाला अन्नधान्य पुरवणारी जीवनरेखा आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षातून शिकण्यासारखे धडे घेतले. त्यांनी शेतीला आदराने पाहण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.
ही मुलाखत विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरली. शेतकऱ्यांच्या अनुभवातून ग्रामीण जीवनाचे वास्तव समजले आणि शिक्षणासोबत समाजाशी जोडले जाण्याची संधी मिळाली.
सदरच्या परिसर भेट आणि मुलाखती ची अनुमती शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक क्षीरसागर सर सोबतच प्रमुख मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या मंदा उरकुडे मॅडम, सौ खैरे मॅडम फुकटसर सर, चव्हाण सर, अलावत सर. यांच्या मार्गदर्शनात पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी वास्तव जीवन शेतकरी कसा जगतात याविषयी माहिती करून घेतली.



