अंबुजा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना एस टी इ एम लर्निंगचे धडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव येथील 43 विद्यार्थ्यांना STEM Awareness Activity मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. हा उपक्रम अंबुजा विद्या निकेतन व अंबुजा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उप्परवाही येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “Earthquake Resistant Building” या विषयावर आकर्षक मॉडेल तयार करून महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics) या चार महत्त्वपूर्ण अंगांचा संगम असलेल्या STEM Learning बद्दल विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून प्रेरणादायी धडे घेतले.
हा उपक्रम अंबुजा सिमेंट लिमिटेडच्या CSR उपक्रमांतर्गत पार पडला. शिक्षण विभागाच्या सौ. सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
या वेळी अंबुजा विद्या निकेतन उप्परवाहीचे प्राचार्य राजेश शर्मा, शिक्षक संदीप नंदगिरवार, श्री अंबर त्रिवेदी, शिक्षिका भारती जोशी, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्राध्यापक अनिल पेंढारकर, अंबुजा फाऊंडेशनच्या कम्युनिटी मोबेलायझर हर्षाली खारकर उपस्थित होत्या
विद्यार्थ्यांच्या सहभागातून विज्ञानाविषयी उत्सुकता, सामाजिक जाणीव आणि नव्या पिढीमध्ये नवोन्मेषी विचारसरणीला चालना मिळाल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.



