ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहराचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय _ आमदार मनोज कायंदे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पश्चिम विदर्भातील प्रति तिरुपती देवस्थान श्री बालाजी महाराजांचे पवित्र स्थानअसलेल्या देऊळगाव राजा शहराची संपूर्ण पंचक्रोशीत ओळख आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सह इतर राज्यातून सुद्धा भाविक येतात. त्यामुळे शहरामध्ये विकसनशील बरेच काही मुद्दे आहे यालाच केंद्रबिंदू मानून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष सह प्रभागातील अधिकृत उमेदवारांना मतदारांनी मतदान करावे असे आवाहन विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. : निवडणूक कोणतीही असो विकासाचे व्हिजन सर्वच जन मांडतात परंतु ते नंतर पूर्ण होत नाही. पण त्याचे काहीसे शल्य हे जनतेच्या मनात कायम घर करून असते. एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आपण जनतेला नवीन काय देऊ शकतो यावरच आमच्या प्रचाराचे प्रमुख ध्येय अवलंबून आहे.

प्रभागातील सदस्यांनी सुद्धा जे कामे होतील त्याच कामाचे आश्वासन जनतेस द्यावे विनाकारण पोकळ आश्वासन देऊ नये जेणेकरून जनतेची दिशाभूल होणार नाही याची सर्वांनी जाणीव ठेवावी. त्यावर पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरआमदार कायंदे यांनी सर्व समावेशक उत्तरे दिली त्यामध्ये दोन माजी आमदार एकत्र येऊन आपल्याला हरवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे यावर बोलताना आमदार कायंदे यांनी एकत्र येणे अनैसर्गिक युती याला आम्ही फारसे महत्त्व देत नसून आम्ही जनतेसाठी काय करू शकतो. हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार असून शहरासाठी स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना, सुलभ शौचालय, ग्रीन झोन मधील भूखंडाचा विकास करणे, याच्यासह खूप काही प्रश्न आहेत ते आमच्या जाहीरनाम्यात आणि प्रसिद्ध करणारच आहोत आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आमची नगरपालिकेत सत्ता असावी त्यासाठी प्रयत्न करत असताना कोणीही खालच्या स्तरावर जाऊन प्रचार करू नये याची आपण सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच भाजपा आणि मित्र पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी माधुरी सिंपणे तसेच काही प्रभागात आमची मैत्रीपूर्ण लढत असून त्या ठिकाणी सुद्धा पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणे गरजेचे आहे. शहर वासियांना तुमच्या नुसत्या घोषणा नाहीतर त्यावर कृती सुद्धा आवश्यक राहील असे कायंदे यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी शिंपणे प्रभागातील सर्व उमेदवार यांच्यासह माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश मांटे, सिद्दीक शेठ, भगवान मुंडे, शंकर तलबे निशिकांत भावसार, सुभाष दराडे, सदाशिव मुंडे सुनील शेजुळकर,राजेश भुतडा, गजानन काकड, गणेश डोईफोडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये