भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रा. सुयोग बाळबुद्धे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
एकुण २३ पैकी २३ उमेदवार निश्चित उमेदवारांची यादी जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी नगर पालिकेची निवडणूक ०२ डिसेंबरला पार पडणार आहे. १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडून प्रा. सुयोग बाळबुद्धे, बालू नंदुरकर, मनोज भूपाल, विलास विखार, मनोज वठे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाचा निश्चित उमेदवारांचा तिढा सोडविला. भारतीय जनता पक्षाकडून ब्रह्मपुरी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे निश्चित उमेदवार म्हणून प्रा. सुयोग बाळबुद्धे यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती प्रा. अतुल देशकर यांनी स्थानिक विठ्ठल रुख्मिणी सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात एकुण २३ उमेदवारपैकी २३ निश्चीत उमेदवारांची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे.
यात *प्रभाग क्रमांक १* (अ) यामिनी दिलीप बढे, (ब) नितेश रमेश आंबोरकर ,*प्रभाग क्रमांक २*(अ) अर्चना संजय उईके (ब ) रितेश रमेशराव दशमवार,*प्रभाग क्रमांक ३* (अ) राहुल सुरेश करंबे, (ब) प्रतिभा राहुल मैंद,*प्रभाग क्रमांक ४* (अ) प्रकाश शंकरराव लोखंडे, (ब) रश्मी कैलास पेशने, *प्रभाग क्रमांक ५* (अ) अंकज मोरेश्वर कानझोडे, (ब) चेतना राजेश येवले, *प्रभाग क्रमांक ०६* (अ) रुपाली उमेश रावेकर (ब) राकेश वेलथरे, *प्रभाग क्रमांक ७*(अ) सूर्यकांत शैलेश गेडाम (ब) अमित प्रभाकर रोकडे, *प्रभाग क्रमांक ८* (अ) दर्शना जयप्रकाश अंडेलकर, ( ब ) मनोज राजाराम वठे, *प्रभाग क्रमांक ९* (अ) मनोज राजेश्वर भूपाल, (ब) पूजा दत्ता येरावार *प्रभाग क्रमांक १०* (अ) स्वप्नील शशिकांत अलगदेवे, (ब) दर्शनाबहेन दिनेशभाई पटेल, *प्रभाग क्रमांक ११* (अ) नंदा उत्तम उरकुडे, (ब) अंजली अनंता उरकुडे, ( क ) हार्दिक ( प्रतिक ) किशोर रत्नपारखी यांचा समावेश आहे.
प्रा. सुयोग बाळबुद्धे यांनी भारतीय जनता पक्षातर्फे नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले असून ही निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास माजी आमदार प्रा. अतुल देशकर व माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेला भाजपा नेते दिपक उराडे, ओबीसी मोर्चाचे प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुद्धे, बालू नंदुरकर, पक्ष समन्वयक कादर शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



