काँग्रेस भाजपा तर्फे उमेदवारांनी नामनिर्देशित अर्ज भरले
ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणूक २०२५

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी २०२५ होऊ घातलेली आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी अंतिम तारीख म्हणून दिनांक १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत भरण्यासाठी उमेदवारांना वेळ देण्यात आली होती .त्यामुळे बऱ्याच पक्षातील विविध उमेदवारांनी आज दिनांक१७ नोव्हेंबरला आप-आपले नाम निर्देशन पत्र ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये भरले.
ब्रह्मपुरी तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी योगेश मिसार यांच्या उमेदवारी अर्ज सोबत काँग्रेस पक्षाच्या २३ नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यात आले.
सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यालयातून नगरपरिषद कार्यालयापर्यंत भव्यदिव्य रॅली काढण्यात आली. त्यासोबतच माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तर्फे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सुयोग बाळबुद्धे यांच्या नावाने नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. सोबतच भाजपाकडून २३ उमेदवारांचे नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित आहेत भरण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे अविनाश राऊत तर शिवसेना (उभाठा) यांची युती आहे तर आम आदमी पार्टी तर्फे दीपक शुक्ला यांनी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबत खोरीपा, रिपाई, शिवसेना (शिन्देगट) गट, कामुनिष्ठ पार्टी. व अन्य घटक पक्षांनी एकत्र तिसरी आघाडी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



