ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठाच्या क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राच्या वतीने बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून भवांजीभाई कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथील सेवानिवृत्त प्रा. नामदेव कन्नाके उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिनेट सदस्य डॉ.सतीश कन्नाके, अध्यासन केंद्राचे प्रस्तावक व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नंदाजी सातपुते, सिनेट सदस्या डॉ.शीला नरवाडे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, केंद्राचे समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड इत्यादी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

      यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.नामदेव कन्नाके म्हणाले जल ,जंगल जमीन यावरील लढा इथपर्यंतच बिरसा चे कार्य मर्यादित नव्हते तर शोषण, धर्मांतरण, विस्थापन या विरोधातील त्यांच्या लढा महत्वाचा होता. त्यांचा लढा जनजाती समुदायापर्यंत मर्यादित न राहता तो समस्त भारतीयांचा लढा ठरला.त्यांचे उलगुलान हे महान क्रांतीचे धोतक आहे.त्यांनी यावेळी बिरसा मुंडांनी केलेल्या ब्रिटिश, जमीनदार व सावकार यांच्या विरोधातील लढ्यांचे व त्यांच्या बालवयातील संघर्षाचे सविस्तर वर्णन केले.

     आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सतीश कन्नाके यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचे सविस्तर विवेचन केले ते म्हणाले वसाहतीच्या मुक्तीच्या त्यांच्या लढ्यातून शोषण विरोधातील आवाज बळकट होण्यास चालना मिळाली.याप्रसंगी अध्यासन केंद्राचे प्रस्तावक डॉ. संजय गोरे यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व अध्यासन केंद्राच्या विविध कार्याची व उद्देशाची सविस्तर माहिती दिली.

        या कार्यक्रमाचे संचालन अध्यासन केंद्राचे केंद्राचे सदस्य डॉ. हेमराज निखाडे तर आभार अध्यासन हे केंद्राचे समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले.यावेळी अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ. प्रिया गेडाम डॉ. नरेश मडावी तथा विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये