ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे वं. राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रचारकांचे भव्य महासम्मेलन

भद्रावती येथे येणार संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो गुरुदेव प्रचारक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव व श्री गुरुदेव प्रचारक दिन अर्थात प्रचारकांचे महासंमेलन दिनांक २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम तसेच महाराष्ट्रातील शेकडो प्रचारकांच्या उपस्थितीत भद्रावती येथे लोकमान्य विद्यालय चे प्रांगणात संपन्न होत आहे.

दिनांक २२ नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी ५.३० वाजता श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन व सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात होईल यानंतर सकाळी ९.०० वाजता ग्रामगीतेवर आधारित विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धा यानंतर दुपारी ठीक २.०० वाजता श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सव अर्थात प्रचारकांच्या महासंमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल .रात्री ठीक ८.०० वाजता श्री नामदेवराव महाराज गंधरे,अमळापूर यांचे कीर्तन होईल .दिनांक २३ नोव्हेंबर रोज रविवारला सकाळी ९.०० वाजता प्रचाराकांसाठी संगोष्टी तसेच१०.००वाजता प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी २.०० वाजता प्रचारक दिन महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे हस्ते संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो प्रचारकांचा भव्य सत्कार करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ७.०० तुकड्यादास सुरुवात नव्या पर्वाची हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात येईल.रात्री ठीक ८.०० वाजता आकाशवाणी दूरदर्शन कलावंत पंडित रघुनाथजी कर्डीकर व सौरभ कर्डिकर ,मुंबई यांचे गीत तुषार हा राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित संगीताचा कार्यक्रम होईल. दिनांक २४ नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी ७.०० रामधून प्रसंगी रविंद्रजी ढवळे यांचे मार्गदर्शन होईल त्यानंतर दुपारी १२.०० वाजता ह.भ.प. निंबाजी महाराज तागड नागपुर यांचे गोपालकाला प्रसंगी कीर्तन दुपारी ठीक २.३० वाजता मंडळाच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली तसेच कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात येईल. यानंतर रात्री ठीक ७.३० वाजता राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धा विजेत्यांचा गौरव व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्यानंतर रात्री ठीक ८.०० वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरी वादक सुप्रसिद्ध प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी नागपूर यांचा तुफान विनोदी प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे तीन दिवस सामुदायिक ध्यान व प्रार्थना प्रसंगी शेषनंद पांडे महाराज, प्रल्हादराव पारिसे दादा,विठ्ठलराव काठोळे दादा,संप्रदाताई डाखरे,आचार्य श्री वेरुळकर गुरुजी,कविताताई येणुरकर यांचे मार्गदर्शन होईल.

या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री गुरुदेव श्री मंडळ भद्रावती व वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती समिती क्षेत्र यावली शहीद यांचे वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये