प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराकडून हत्या
गडचांदूर येथून दोन आरोपीला अटक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील मन हेलवणारी नारांडा येथील घटना असून दिनांक 16/11/2025 ची सायंकाळी सात ते आठ वाजताची घटना असून प्राप्त माहिती मयत नितेश रामदास वाटेकर रा.नारांडा वय 38 वर्ष वनसडी येथे सलूनचे दुकान चालवत होता.
2022 पासून नितेश व त्याची पत्नी साधना व मुलगी महेक वंय 9 हे गडचांदूर येते अरविंद ताकसांडे यांच्या घरी भाड्याने राहत होते. दररोज सकाळी 8 वाजता गडचांदूर येथून वनसडी येथे आपल्या सलून चा धंदा करून सायंकाळी 8 वाजता परत जात होता. पत्नी साधना घरी एकटीच राहत होती. बादल सोनी हा याच्या घरी येत होता त्या दोघांची चांगली ओळख झाली त्याचे रूपांतर प्रेमात नंतर अनैतिक सबंध आले .या प्रेमप्रकरणामुळे नितेश व साधना पती पत्नीत नेहमी वाद होत होते. तसेंच बादल विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली यांच्यपुढे मी असे कृत्य करणार नाही असे सांगितले . काही महिने नितेश व साधना हे चंद्रपूर येथे राहण्यास गेले चंद्रपूर वरून आपल्या गावी नारांडा एक महिन्या पासून कुटुंबासह राहून वनसडी येतील सलून चे दुकान नेहमी चालवत व कुटुंबाचे उदरणीर्वाह आनंदाने करीत होता.
मात्र बादल व साधना याचे प्रेमप्रकरण पडद्या चालू होते. बादलणे साधणाला मोबाईल सुद्धा घेऊन दिला फोन वरून साधणा कडून नितेश बद्दल दुकानात केव्हा जाते परत किती वाजता येते माहिती घेतली तसेच माझ्या सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या न माझ्या प्रेमात आडवा आल्यास नितेश् जिवे मारण्याची धमकी देत होता.नेहमी प्रमाणे नितेश 16/11/2025 ला संध्याकाळी 7 वाजता सलून चे दुकान बंद करून वनसडी वरुन् नारांडा घरी येत असताना नारांडा पोच मार्गावर पुलाजवळ दुचाकीचा अपघात होऊन रोडवर गंभीर अस्थेत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली त्याच्या नातेवाईकांनी नितेशला ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे उपचारासाठी आणले नितेशच्या डोक्याला गंभीर जखमा होऊन असल्याने त्याला डॉकटरांनी मृत्यू घोषित केला त्या अनुसंघाणे मर्ग दाखल करून उत्तर तपासानी साठी शव पोलिसांनी ताब्यात घेतले
कोरपणा पोलिस पथकाने 17 ला सकाळी घटना स्थळाची पाहणी झाल्यावर घटनेत पोलिसाना संशय आला हा अपघात नसून घाटपात असल्याचे निष्पणझाले कोरपणा पोलीस पथकाने उलटे चक्र फिरवून अवघ्या चार तासात दोन आरोपीना गडचांदूर येथून आरोपी बादल सोनी वय 22 धंदा स्टाईल काम दुसरा तुशार येणगंटीवर वय 19 धंदा लाईट फिटिंग दोन्ही राहणार गडचांदूर अटक केली याच्या विरोधात कोरपणा पोलीस स्टेशनला अप क्र. 0270/2025 भा.न्या स कलम 203 ( 1) ,2(5) बी एन. एस.अनवे गुन्हा दाखल करण्यात आला शव विच्छेदन करून शव नातेवाईकांना अंत्यविधी देण्यात आले.
घटना स्थळी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक व रवींद्र जाधव उव विभागीय पोलीस अधिकारी याची भेट घटनेचा पुढील तपास लता वाढीवे मॅडम ठाणेदार कोरपणा,देवानंद केकण पोलीस उपनिरीक्षक, प्रकाश राठोड पोलीस उपनिरीक्षक,प्रभाकर जाधव पो.ह साईनाथ जायभाये पो ह.बळीराम पवार पोह राकेश वाकुलकर पोह ,रामदास आडे ना.पो.पंढरी सिडाम पोह. तपास करीत आहे.



