ने.ही. कन्या विद्यालय,ब्रह्मपुरीची विद्यार्थिनी कुमारी.यशोदा अजय खुळशिंगे हिणे राज्यस्तरावर मिळविले कांस्य पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२/११/२०२५ ला एस.वी.जे. एस. सी.टी.ग्राउंड, डेरवन , जिल्हा रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षा आतील मुलींच्या गटात हातोडा फेक (हॅमर थ्रो) स्पर्धेत ने.ही. कन्या विद्यालय,ब्रह्मपुरी ची विद्यार्थिनी कुमारी. यशोदा अजय खुळशिंगे हीने उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावित कांस्य पदक आपल्या नावावर केले त्याबद्दल तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे आपल्या विजयाचे श्रेय कुमारी.यशोदा हीने तीचे आई व वडील व चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी मा.अविनाशजी पुंड साहेब,ने. ही.शिक्षण संस्थेचे सचिव मा.अशोकजी भैया साहेब, तालुका क्रीडा अधिकारी मा.मोरेश्वर गायकवाड सर , तालुका क्रीडा संयोजक मा.गोपालजी भानारकर सर
ने.ही. कन्या विद्यालय, ब्रम्हपुरी च्या मुख्याध्यापिकामा.बनपुरकर मॅडम, क्रीडाशिक्षक मा. बारेकर सर मा.भारती बन मॅडम, प्रशिक्षक राहुल जुआरे सर यांना दिले कुमारी. यशोदा खुळशिंगे ही मागील १ वर्षापासून पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संचालक राहुल जुआरे सर यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी तालुका क्रीडा संकुल येथे सराव करत आहे.



