बनावटी चलनी नोटा तयार करीत असल्याची पोलिसांना माहिती., सदर ठिकाणी छापा
एकूण सर्व नकली नोटा संपूर्ण मुद्देमालासह जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक १५/११/२०१५ रोजी प्राप्त माहितीचे आधारे केजाजी चौक गौंड प्लॉट, वर्धा येथे राहणारे डॉ. प्रकाश तळवेकर यांचे घराच्या सर्वात वरील मजल्यावर राहणारे भाडेकरी हे त्यांचे घरी बनावटी चलनी नोटा तयार करत असल्याबाबत माहीती पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन यांना प्राप्त झाल्याने त्यांनी त्यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना सुचना देवून एकुण तिन पथके तयार करून तसेच पोलीस ठाणे वर्धा शहर येथील ठाणेदार श्री. संतोष ताले पोलीस निरीक्षक यांचे सुध्दा एक पथक असे एकत्रीत सदरचे ठिकाणी पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे सदरचे ठिकाणी घेराबंदी करून रात्री १२.३० वाजताचे सुमारास चारही पथकांनी सदर ठिकाणी पंचासह छापा टाकला असता सदर ठिकणी एक विधीसंघर्षीत बालक मिळून आला त्या ठिकाणी झडती मध्ये एकुण १४४ भारतीय चलनातील ५००/रुपयांची नकली बनावटी नोटा, प्रींटर, १२/१२ इंचची लाकडी फ्रेम, ६/६ इचची लाकडी फेम, १२/१८ इंचची काचेची फ्रेम, ए४ साईज चे पेपर, इंक बॉटल व इतर साहीत्य मिळून आल्याने जप्त करण्यात आले.
सदर प्रकरणात पोलीस स्टशेन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक १६५५/२०२५ कलम १७८ (३) (४),१७९,१८०,३ (५) भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अधिक तपास केला असता असे दिसून येत आहे की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी ईश्वर लालसींग यादव हा आपले साथीदार धनराज धोटे, राहूल आंबटकर व विधी संघर्षीत बालक यांचे सोबत मिळून नकली नोटा तयार करण्याचे काम करीत होता व गावो-गावी आठवडी बाजारात साथीदारांना पाठवून नकली नोटा चलनात आणत होता. तपासात असेही समोर आले आहे की, मुख्य आरोपी ईश्वर यादव चे दोन साथीदार धनराज धोटे व राहूल आंबटकर यांना मालेगाव नाशिक येथे नकली नोटा चलनात आणणेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्याची प्रक्रीया करण्यात येत आहे. तसेच गुन्हयातील मुख्य आरोपी ईश्वर यादव यास त्याचे साथीदार पकडले गेले असल्याबाबत चाहूल लागताच तो घटनास्थळाहुन काही महत्वाचे पुरावे घेवून फरार झाला असून त्याचे शोधकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेग-वेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू असून मालेगाव नाशिक येथे अटक असलेले दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू असून मुख्य आरोपी याचा शोध घेवून यात आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का याबाबत तपास करण्यात येत आहे.



