महाराष्ट्र शासनातर्फे गरमसूर पुनर्व्हसनला हिरवी झेंडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
तालुक्यातील बोर वन्यजीव अभयारण्य-२ याला राखीव क्षेत्र व्यतिरिक्त विस्तारित करण्यासाठी शासनाला गरमसुर गाव हे सर्व द्रुष्टीने ईष्ठ व योग्य वाटत असल्याने याची निवड करण्यात आली आहे. सेलु तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे गरमसूर येथील पुनर्वसन प्रक्रियेला हिरवी झेंडी मिळाल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.
प्राप्त माहिती नुसार दि. 14.11.2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील गरमसुरच्या पनर्वसन प्रक्रियेला हिरवी झेंडी मिळाल्याचे बोलले जात आहे.विस्तारित बोर वन्यजीव अभयारण्य-2 या नावाने परिचित वन्यजीव अभयारण्य म्हणून अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र गठीत करण्याच्या उद्देशाने. गरमसुर याच्या हद्दी सिमांकित करीत आणि त्या प्रयोजनासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
राखीव वन क्षेत्रा व्यतिरिक्त बोर वन्यजीव अभयारण्य-2 विस्तारित करणे आवश्यक आहे. परिस्थितीकीय,प्राणीजातीय,वनस्पतीजातीय,भूरुपीकीय,नैसर्गिक व प्राणीशास्त्रविषयक पुरेसे महत्व वाटत असल्यामुळे त्यामधील वन्यजीवांचे संरक्षण,त्याची पैदास व वाढ करण्याच्या प्रयोजनासाठी व पर्यावरणासाठी सदर क्षेत्राचा अभयारण्यात समावेश करणे शासनास ईष्ट वाटत आहे.
जिल्हाथिकारी वर्धा यांचे आदेशानुसार सेलू तहसीलदार यांनी नियुक्त केलेले सर्व अधिकारी आणी पंचायत समिती गटविकास अधिकारी पानबुडे यांनी पुनर्वसन यादीनुसार पुनर्वसन कोणत्या पद्धतीने केल्या जाईल तसेच गावातील सर्व लाभार्थी यादीचे वाचन करून दाखविले. या वेळेस सर्व गावकर्यांनी गावात आलेल्या पुनर्वसन समितीचे आणी उपस्थित अधिकार्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.



