ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘बालक दिनाच्या’ पर्वावर शालेय परिवारा कडुन विजेत्या चमूचे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय भूमिकाअभिनय स्पर्धेत म्युनिसिपल कमला नेहरू हायस्कूल,वर्धा येथील वर्ग 9 वीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला व नंबर मध्ये येऊन शाळेचा नाव लौकिक वाढविला.

शाळेच्या मुख्याध्यापिका मैथिली मुळे यांनी ध्येय प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या उईके मॅडम व जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच प्रसंगावधान राखून प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.मार्गदर्शिका हर्षा उईके यांनी राज्यस्तरावर अभिनय सादरीकरणाचे अनुभव विशद केले आणि आनंद व समाधान व्यक्त केले.तसेच मुख्याध्यापिका मॅडमचे विशेष आभार व्यक्त केले.

अगदी वेळेवर पत्र मिळाल्यामुळे एवढे सर्व आयोजन व नियोजन करण्यात त्यांचे श्रेय असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होता आले हे त्यांनी सांगितले.कु.आभा पचेरवार हिने आपले अनुभव सांगितले.’बालक दिनाच्या’ पर्वावर शालेय परिवारा कडुन विजेत्या चमूचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये