माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते दोन कोटी पन्नास लाखांच्या विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगरपरिषद क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहीत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिलेल्या वचनांची पूर्तता केली आहे. दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला.
वचनपूर्तीच्या भावनेने प्रेरित होत डॉ. खेडेकर यांनी नगरातील सर्वच प्रभागांमध्ये लोकहिताची कामे साकारली. या लोकार्पण सोहळ्यात देऊळगाव राजा जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला विकास पुरुष त्यांना संबोधले जाते. प्रभाग क्रमांक १ मधील श्री मारुती मंदिर संजय नगर येथील कंपाउंड वॉल, तसेच भगवान गौतम बुद्ध विहार सामाजिक सभागृह यांचे उद्घाटन झाले.
तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील श्री खोरेश्वर महादेव मंदिर सभागृह, पत्रकार भवन हे देखील देण्यात आले बऱ्याच वर्षापासून पत्रकार भवनांचा मार्ग मोकळा करून दिला आहे त्यामुळे पत्रकारांनी त्यांचे आभार मानले, खोरेश्वर नगर क्रीडांगण, मानसिंगपूरा श्री मारुती मंदिर सभागृह आणि प्रभाग क्रमांक ७ मधील शिंगणे नगर क्रीडांगण ही कामे देखील पूर्णत्वास नेण्यात आली.
प्रभाग क्रमांक ८ मधील श्री सुखानंद स्वामी मठ सभागृह, प्रभाग क्रमांक ४ मधील श्री जिव्हेश्वर मंदिर सभागृह, तसेच कुंभारवाडा शनिवार पेठ येथील श्री मारुती मंदिर सभागृह, प्रभाग क्रमांक ३ मधील विवेकानंद नगर क्रीडांगण, प्रभाग क्रमांक २ मधील श्री भगवान बाबा नगरातील गोपीनाथ मुंडे साहेब उद्यान,आणि कोष्टी समाज स्मशानभूमी दहन शेड या विकासकामांचेही लोकार्पण या सोहळ्यात झाले.
या भव्य सोहळ्याला शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, तसेच समस्त शिवसेना परिवारातील सर्व कार्यकर्ते आणि प्रत्येक विभागातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेने डॉ. शशिकांत खेडेकर यांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “आज त्यांनी दिलेल्या शब्दाची खरी वचनपूर्ती केली आहे. विकासाच्या दिशेने देऊळगाव राजा हे शहर पुढे चालले आहे.त्यांनी आणलेल्या निधी मधून शहरात करोडोंची विकास कामे पूर्ण झाली आहे, शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे,



