महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संरक्षणाची शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे 15 नोव्हेंबर रोजी इको क्लबच्या माध्यमातून माझी वसुंधरा, पर्यावरण संरक्षण व त्याची अमलबजावणी कशी करता येईल या उद्देशाने पर्यावरण संरक्षण यावर विद्यार्थ्यांना इको क्लबचे अधिकारी प्रा. नरेंद्र हेपट सर यांनी शपथ दिली तर प्रा. आशिष देरकर सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले कि, प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावले पाहिजे व संबंधित लोकांना सुद्धा झाड लावण्यासाठी प्रेरित केले पाहिजे व प्रदूषण कसे रोखता येईल याची माहिती आपल्यासोबत संबंधितापर्यंत पोहचली तर खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे संरक्षण होईल.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहुरे सर, कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर पसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन भैसारे, प्रा. सुधीर थिपे, प्रा. प्रताप शेंडे व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इको क्लबचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.



