ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसद येथे जैविक शेती जागृती व शेतकरी सम्मान कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पुसद येथील वसंतराव नाईक स्मृति प्रतिष्ठानमध्ये जैविकशेती जागृती आणि शेतकरी सत्कार कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. ज्ञानप्रकाश लोकसंस्था आणि वसंत बहार अ‍ॅग्रोटेक,नागपूर व स्व. बाबासाहेब नाईक कृषी विज्ञान केंद्र, हुडी ता.पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील कृषी आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक याडी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध, अभ्यासू लेखक,समीक्षकमा. याडीकार पंजाब चव्हाण होते. अध्यक्षस्थानी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा.मनीष जाधव यांनी भूषविले. मुख्य मार्गदर्शक व ज्ञानप्रकाश लोकसंस्था, नागपूरचे अध्यक्ष, श्रीपतभाऊ राठोड होते. यवतमाळ जि.प.चे माजी जिल्हा परिषद सदस्य मा.रामराव चव्हाण हे कार्यक्रम संयोजक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून सेवाभूमीचे मा.शंकर आडे, पोहोरागड मा.सुभाष राठोड, सेवानिवृत्त डीवायएसपी आणि ह.भ.प.भारत घोगरे, महाराज उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, शेतकरी विकास अभियानचे रामराव चव्हाण यांनी केले व त्यानंतर जैविक शेतीचे यशस्वी आणि फायदेशिर प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे मनोगत ऐकण्यात आले. याडी फाउंडेशनच्या वतीने, यांनी मान्यवरांसह संतोष चव्हाण यांच्या कृषी क्षेत्रातील कौतुकास्पद कार्याबद्दल सत्कार केला. श्रीपतभाऊ राठोड यांनी जैविकशेतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले,सुपीक माती समृद्ध शेती असे त्यांनी यावेळी आवर्जून प्रतिपादन केले. त्यांचे सादरीकरणात त्यांनी ‘सत्यक्रांती’ या काव्यसंग्रहातील स्व-रचित कवितांचे दोन कविताचे सादरीकरण केले.कार्यक्रमात सेवाभूमीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन देखील थाटात करण्यात आले.

याडीकार पंजाब चव्हाण यांनी आपल्या अनुभवी भाषणातून शेती आणि शेतकऱ्यांबद्दलचे आपले विचार मांडले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी वसंत विचार पेरले पाहिजेत,असे ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात मनीष जाधव यांनी त्यांचे मौलिक आणि माहितीपूर्ण विचार मांडले,शेती व शेतकऱ्यांची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती असे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

युवा कार्यकर्ता विजय राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन ज्ञानप्रकाश लोकसंस्थेच्या जयश्रीताई श्रीपत राठोड यांनी केले, त्यांनी बंजारा समाजातील समस्यांवर स्वतः लिहिलेले गीतही सुंदरपणे सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दिपाली,अंजली राठोड, ऋषभ ठाकरे सह निलेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये