वडगाव येथे आदिवासी जनजाती गौरव पंधरवाडा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आद्य क्रांतिकारक धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिनांक 1 नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्याचे शासन आदेश असल्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव या शाळेने सदर सप्ताह यशस्वीरित्या साजरा केला. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावर वारली चित्रकला निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा व नृत्य गायन स्पर्धा घेण्यात आल्या. व काल बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोंडी ढेमसा नृत्य रॅली काढण्यात आली. घुसाडी बनून आलेल्या आदिवासी बांधवांनी संपूर्ण विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती वडगाव व सर्व गावकरी मंडळी वडगाव यांनी केले.
पंचायत समिती कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी श्री कल्याण जोगदंड व केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर यांच्या मार्गदर्शनात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री काकासाहेब नागरे यांनी नियोजन केले यशस्वीते करिता पुष्पा इरपाते मॅडम विनायक मडावी सर नितीन जुलमे सर अनिल राठोड सर सचिन सोनपित्रे कुंती आंबेकर वैष्णवी ठाकरे यांनी परिश्रम घेतले.



