वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ दिनांक ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशन, हिंगणघाट येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्याचा मान उंचावला.
१४ वर्षाखालील गटात कु. कनक विनोद कोल्हे हिने २७ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. तिची गुजरातमधील गंगानगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ती या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच कु. तन्वी कैलास कन्नाके हिने ३२ किलो वजनगटात कास्यपदक मिळविले.
१७ वर्षाखालील गटात कु. ज्ञानेश्वरी दीपक मेश्राम हिने -४० किलो वजनगटात कास्यपदक मिळविले, तर यश महेंद्र मुक्तेवार याने -४५ किलो वजनगटात रौप्यपदक (सिल्वर) पटकावत दमदार कामगिरी केली.
१९ वर्षाखालील गटात कु. वैष्णवी जितेंद्र बनसोड हिने कास्यपदक मिळवून उल्लेखनीय योगदान दिले.
या सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच त्यांच्या पालकांचे वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच मार्गदर्शन करणारे मुख्य प्रशिक्षक जीवन कामडी (B.B), चंद्रशेखर देशकर (B.B), ओम पवार, तिलक राणे (B.B) आणि शुभम तडस यांना दिले.
वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विजेत्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधिक उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच राजेशदादा कोमलवार, अमोल बोडके, दीपक मेश्राम, मानसी गाठे, धनश्री गाठे, दिपाली मेश्राम, अतुल मदनकर, सचिन ढोकपांडे, साहिल ठक, दुर्गेश, गणेश कन्नाके, सत्यप्रकाश इंगळे, योगेश देवगिरकर, कुणाल शिंदे, वैभव हिवरकर, संमक नगराळे, कृष्णा हुरले, शंकर नैताम, अतुल सोनकुसरे, पवन निलेकर, गौरव कामडी, शौर्य भगत, रणवीर इतवारे, प्रणय मिसाळ, असंग रामटेके यांनीही विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.



